दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांचा बहुचर्चित चित्रपट ‘पुष्पा 2’ने सगळेच रेकॉर्ड मोडत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने तीन दिवसांत बॉलिवूड आणि साऊथच्या सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 200 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.
अल्लू अर्जुनने ‘पुष्पा: द रुल’ या चित्रपटाने हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचे सर्व विक्रम मोडून काढले आहेत. साऊथ सिनेसृष्टीशिवाय बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारही अल्लूच्या स्टारडमसमोर फिके पडले आहेत. हा चित्रपट केवळ दक्षिण भाषांमध्येच नाही तर हिंदीतही रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.
पुष्पा 2 हा मुळात तेलुगु पॅन इंडिया चित्रपट आहे. तसेच पहिल्या दिवशी तेलुगूमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पुष्पा 2 च्या हिंदी व्हर्जनने तेलुगू व्हर्जन मागे टाकले. अल्लू अर्जुनने शाहरुख खान, रणबीर कपूर, सलमान खान आणि सनी देओल यांसारख्या अनेक हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार्सचे रेकॉर्ड्स मोडले आहेत.