साऊथ अभिनेता अल्लू अर्जुचा बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2′ रिलीय व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. सिनेमाला रिलीज व्हायला 48 तास बाकी असूनही या सिनेमाने मोठेमोठे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या सिनेमाने रिलीजपूर्वीच 100 कोटींचा आकडा पार केला आहे. सिनेमाचे 3डी व्हर्जन 5 डिसेंबरला रिलीज केला जाणार नाही. दरम्यान ‘पुष्पा 2’ च्या हिंदी व्हर्जनला सेंसर बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे.
मागच्या वर्षी 28 नोव्हेंबर रोजी ‘पुष्पा 2’च्या तेलगू व्हर्जनला सीबीएफसीने पास केले होते. सिनेमाचा वेळ आधीच चर्चेचा विषय बनलेला आहे. या दरम्यान सिनेमाचे काही कट्सही लावण्यात आले आहेत. तेलगूनंतर सिनेमाच्या हिंदी व्हर्जनालाही हिरवा झेंडा मिळालेला आहे. नुकतीच बॉलीवूड हंगामामध्ये एक रिपोर्ट आला होता. त्यात हिंदी व्हर्जनला काही कट्स लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये 3 ठिकाणी आक्षेपार्ह असलेली भाषा बदलली आहे, ज्या सीनला तेलगूमधून हटविण्यात आले असून आता हिंदी व्हर्जनमधूनही हटविण्यात आले आहे.
शिवाय सिनेमात जिथे जिथे सिगारेट ओढळ्याचा सीन आहे. तिथे अॅण्टी स्मोकिंग सीन आहेत, तिथे स्मोकिंग वॉर्निंग टाकायला सांगितले आहे. खरंतर सिनेमात फारसे काही बदल झालेले नाहीत. छोटे-छोटे कट्स होते ज्यात बदल करुन सिनेमा पास करण्यात आला, विशेष म्हणजे या सिनेमाने रिलीज होण्यापूर्वी जगभरातून 100 कोटींची अॅडवान्स बुकिंग केली आहे.. हा आकडा फार मोठा आहे.