‘फायर नही, वाईल्ड फायर’ म्हणत साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘पुष्पा-2’ हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. या सनेमाने रिलीज होण्यापूर्वीच भरपूर कमाई केली होती. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ होती की, आगाऊ बुकिंगमध्येच सर्व रेकॉर्ड मोडले.दरम्यान आता रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘पुष्पा-2’ ने सर्व भाषांमध्ये रेकॉर्ड ब्रेक केले आहे. या चित्रपटाने हिंदी भाषेत तब्बल 67 कोटींचे कलेक्शन केले आहे.
सुपरॉस्टार अल्लू अर्जूनचा पुष्पा द राइज हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासूनच या चित्रपटाने आणि आपल्या डॅशिंग भूमिकेने अल्लू अर्जूनने चाहत्यांना वेड लावले होते. यानंतर पुष्पा 2 या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. यानंतर अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा 2’नं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला. ‘पुष्पा 2’ ने शाहरुख, प्रभास यासंरख्या अभिनेत्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. या चित्रपटाने देशातील हाईएस्ट ओपनरचा मान पटकावला असून पहिल्याच दिवशी 67 कोटींची कमाई केली.
‘पुष्पा 2’नं तोडले सर्वांचे रेकॉर्ड
किंग खान शाहरुखच्या जवान या चित्रपटाचा रेकॉर्ड देखील पुष्पा 2ने मोडीत काढला आहे. जवाननं पहिल्या दिवशी रिलीज झाल्यानंतर 65 कोटी रुपये कमावले होते. तर, ‘पुष्पा 2’चं हिंदी भाषेत ओपनिंग डे कलेक्शन 67 कोटी रुपये आहे. शुक्रवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.