पठाणकोटमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी, बीएसएफकडून पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान

पंजाबमधील पठाणकोटजवळ आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफने घुसखोरीचा डाव उधळून लावत एका पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा केला. बीएसएफला बुधवारी सकाळी ताशपतन सीमा पोस्टजवळ संशयास्पद हालचाली दिसल्या. यानंतर बीएसएफने कारवाई केली.

एक पाकिस्तानी घुसखोर आंतरराष्ट्रीय सीमेवरून हिंदुस्थानात घुसण्याचा प्रयत्न करत होता. बीएसएफच्या जवानांनी त्याला इशारा दिला. मात्र त्याने जवानांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत आगेकूच सुरूच ठेवली. अखेर संभाव्य धोका लक्षात घेता जवांनांनी घुसखोराला कंठस्नान घातले.

घुसखोराची ओळख अद्याप पटली नाही. या घुसखोराचा उद्देश काय होता याबाबत तपास सुरू आहे. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.