शेतकरी नेते डल्लेवाल यांनी 131 दिवसांनी सोडले उपोषण

पंजाबमधील शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी 131 दिवसांनंतर आज बेमुदत उपोषण मागे घेतले. गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरपासून पिकांच्या किमान आधारभूत किमतीवर कायदेशीर हमीसह विविध मागण्यांसाठी त्यांचे उपोषण सुरू होते. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आमरण उपोषण मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर डल्लेवाल यांनी ‘किसान महापंचायत’मध्ये ही घोषणा केली.