
सोशल मीडियावर ‘इन्स्टा क्वीन’ म्हणून मिरवणाऱ्या एका वरिष्ठ महिला कॉन्स्टेबलला पंजाबमधील भटिंडा पोलिसांनी हेरॉइनसह अटक केली. ही महिला पोलीस आपल्या नव्या कोऱ्या थार कारमध्ये हेरॉइनची तस्करी करत होती. तिने एक महिन्याआधीच थार कार विकत घेतली होती. गिअर बॉक्समध्ये तिने 17.71 ग्रॅम हेरॉईन लपवली होती. हेरॉइनसह पकडलेल्या महिला कॉन्स्टेबलला तत्काळ नोकरीवरून काढून टाकले आहे.