पुणे विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थिनींकडून मद्य प्राशन आणि अंमली पदार्थाचे सेवन, तक्रार करूनही कारवाई नाही

सावित्रीबाई फुले विद्यापीठातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही विद्यार्थिनी वसतिगृहातच मद्य आणि अंमली पदार्थाचे सेवन करत आहेत. या प्रकरणी एका विद्यार्थिनीने प्रशासनाकडे तक्रार केली, तरी प्रशासनाने कारवाई केलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठीतील काही विद्यार्थिनी वसतीगृहाच्याच खोलीत मद्य, धुम्रपान आणि अंमली पदार्थाचे सेवन करत होत्या. इतकेच नाही तर या बाबत एका विद्यार्थिनीने विरोध दर्शवला पण या विद्यार्थिनींनी तिलाच धमकी दिली. इतकंच नाही विरोध करणाऱ्या तरुणीला जबरदस्ती दारु पाजण्याचा प्रयत्नही केला. या प्रकरणी या तरुणीने प्रशासनाकडे तक्रार केली, परंतु प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही.