सूर्य कोपला…! पुण्यात उष्णतेची लाट, विदर्भाला मागे टाकत पारा चाळीशी पार

राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाचे सावट होते. याचा फटका पुणे शहराला बसला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी तापमानात घट झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पुण्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. पुणेकर अक्षरश: घामाच्या धारांनी भिजले आहेत. यंदा पुण्यातील तापमानाने उच्चांक गाठला असून  विदर्भालाही मागे टाकले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोहगावात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. सध्या तेथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची अक्षरश: झोप उडाली आहे. हे पुण्यातील आत्तापर्यंतचे सर्वाधिक तापमान असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता पुणेकरांनी या रखरखत्या ऊन्हात घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे.

लेख – तापमानवाढ आणि आपण

मध्य महाराष्ट्रासह विदर्भात, मराठवाड्यातही तापमान वाढले आहे. यामध्ये विदर्भातील सर्वाधिक तापमान असलेल्या अकोला जिल्ह्यात 43.7 अंश तापमानाची नोंद झाली आहे. याचसोबत चंद्रपूरमध्ये 42.4, यवतमाळमध्ये 42.2, वाशिममध्ये 41 अंश तापमानाची नोंद आहे. तर मराठवाड्यातील बीडमध्ये 42.4 अंश तापमान आहे. तसेच उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील तापमान 40 अंश डिग्री सेल्सिअल इतके आहे. ठिकठिकाणी रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाल्याने नागरिकांची प्रचंड दमछाक झाली आहे.

उन्हाचा तडाखा वाढला; मुंबईकर भिरभिरले, ठाण्याच्या तापमानातही मोठी वाढ