पुण्यात चाललंय काय? घरी जात असलेल्या पोलिसाला 4 मद्यपींकडून बेदम मारहाण

पुण्यात पोलिसांवरील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अलीकडेच पुण्यात एका पोलीस निरीक्षकावर टोळक्याने कोयत्याने हल्ला केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा पोलिसावर हल्ला झाल्याची घटना पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आपलं कर्त्यव्य बजावून घरी जात असताना एका पोलिसाला चार मद्यपींकडून बेदम मारहाण केल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना रुग्णालयाच्या परिसरात घडली होती. चंद्रकांत जाधव, असं मारहाण झालेल्या पोलीस कर्मचारीचे नाव आहे. चंद्रकांत जाधव यांच्यासोबत घडलेला प्रकार पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना समजताच चतुःश्रृंगी पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात अली होती. याप्रकरणी चंद्रकांत जाधव यांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई करत रुपेश मांजरेकर, अनिकेत घोडके आणि अभिजीत डोंगरे या तिघांना अटक केली. तसेच इतर एकाच शोध घेतला जात आहे. पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे.