बेवारस रुग्णाला निर्जनस्थळी सोडले; डॉक्टर निलंबित, ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

एका जर्जर आजारावरील उपचारासाठी ससूनमध्ये दाखल असलेल्या आणि दोन्ही पाय नसलेल्या या रुग्णाला येथील एका डॉक्टरने निर्जनस्थळी सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱया या कृत्याचे बिंग एका रिक्षाचालकामुळे फुटले आहे.  दरम्यान, याप्रकरणी अस्थिरोग विभागातील निवासी डॉक्टर आदिकुमार याला निलंबित करण्यात आले आहे.

नीलेश हिनवटी असे या बेवारस रुग्णाचे नाव असून तो मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. डांगे चौकात झालेल्या अपघातात त्याच्या दोन्ही पायांवरून बसचे चाक गेल्याने त्याचे शस्त्र्ाक्रिया करून दोन्ही पाय घोटय़ापासून कापून काढावे लागले.

‘वंचित’चे रितेश गायकवाड आणि रुग्ण आधार फाऊंडेशनचे दादासाहेब गायकवाड यांनी या रुग्णाला ससूनमधील डॉक्टर आणि सेवकाने सोडून दिल्याचा आरोप केला आहे. 21 जुलै रोजी रात्री रितेश गायकवाड रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाच्या आऊट गेटवर उभे होते. यावेळी रुग्णालयातील डॉ. आदिकुमारने एका बेवारस रुग्णाला सोडायचे आहे, येणार का? अशी विचारणा त्यांना केली. त्यानंतर दोन्ही पाय नसलेला जखमी रुग्णाला त्यांनी रिक्षात बसवून विश्रांतवाडी येथील निर्मनुष्य ठिकाणी भरपावसात सोडून  दिले.