
पुण्यातील खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आज सकाळी हा विसर्ग वाढवण्यात आला. 27203 क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी 6:00वा. 35574 क्यूसेक्स करण्यात आला आहे. ज्यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाला आहे.
सिंहगड रोडवरील सोसायट्यांना याचा अधिक फटका बसल्याचं दिसत आहे. सिंहगड रोडवरील विठ्ठल नगर परिसरात पाणी शिरलं आहे. तर एकता नगरी भागातील द्वारका, जलपुजन, शारदा सरोवर, शाम सुंदर सोसायटीत पुराचे पाणी शिरले. पार्किंग परिसर पाण्यात गेल्यानं नागरिकांना त्यातूनच रस्ता काढावा लागत आहे. तर लोकांची सुरक्षित स्थळी जाण्यासाठी धावपळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
पुणे: खडकवासलाच्या सांडव्यावरून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग; शहरातील अनेक भाग जलमय, सिंहगड रोडवरील सोसायट्यांना अधिक फटका, पार्किंगचा भाग पाण्यात, लोकांची सुरक्षित स्थळी जाण्यासाठी धावपळ. (सर्व फोटो: चंद्रकांत पालकर, पुणे) #PuneRains #PuneNews #PuneTraffic #punecity #Punekars pic.twitter.com/xPeCsFHXxD
— Saamana (@SaamanaOnline) July 25, 2024
#WATCH | Pune, Maharashtra: Visuals of Bhide bridge as the Mula Mutha River flows above the danger level. pic.twitter.com/XledtWIBbr
— ANI (@ANI) July 25, 2024