
पुण्यात कालपासून पावसाने थैमान घातले असून रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षात पुणे शहरातील मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी बचाव मदतीसाठी केलेल्या उपाययोजनांची त्यांना माहिती दिली. शहरात प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याने नागरिकांना आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
दरम्यान, मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर कण्यात आली आहे. मात्र पुणे शहरातील शासकीय कार्यालयांना सुट्टी नाही. इतर आस्थापनांना आवश्यकतेनुसार सुट्टी देण्यात यावी आणि आवश्यकतेनुसार वर्क फ्रॉम होम करण्यात यावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
फळे व भाजीपाला निर्यात परिषद पुढे ढकलली
मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे 26 जुलै 2024 रोजी, निगडी पुणे येथे होणारी “फळे व भाजीपाला निर्यात परिषद” पुढे ढकलण्यात आली आहे. याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती संबंधितांनी पुणे जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
Pune News : पुण्यात विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू; मावळमध्ये दरड कोसळून एक ठार, एक जखमी
पालकमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना
मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून राज्यातील अतिवृष्टी आणि मदतकार्याचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते स्वत: जिल्ह्यात उपस्थित राहून बचाव आणि मदतकार्याचे नेतृत्वं करणार आहेत.
View this post on Instagram