मतदान करणाऱ्यास पेट्रोल फ्री मिळणार

पुण्यात मतदानांचा टक्का वाढावा यासाठी काही संघटनांनी पुढाकार घेतला आहे. मतदान केल्यानंतर पेट्रोल पंपावर एक लीटर इंजिन ऑईल खरेदी केल्यानंतर 50 रुपयांचे पेट्रोल आणि हॉटेलमधील जेवणाच्या बिलात 10 टक्के सूट दिली जाणार आहे. लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी मोठय़ा प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनांच्या पदाधिकाऱयांकडून करण्यात आले आहे. या मोहिमेत ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ, गृहनिर्माण संस्था जोडल्या गेल्या आहेत. याची माहिती सोशल मीडियावरही दिली जात आहे, असे संघटनेच्या पदाधिकाऱयाने सांगितले.