
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित केगाव येथील सिंहगड पब्लिक स्कूलच्या शिक्षकांवर वर्षभर चांगले काम आणि शंभर टक्के उपस्थिती लावणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षात शंभर टक्के उपस्थिती लावणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून सपना शेलार आणि जुवेरिया शेख या दोन महिला शिक्षिकांना चांदीची नेम प्लेट देऊन सन्मानित केले. कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या हस्ते, प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले यांच्या उपस्थितीत सन्मान केला.
दरवर्षी असा शिक्षकांचा सन्मान केला जातो. यामुळे शाळेतील वातावरण निकोप आणि सकारात्मक राहत आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीनिमित्त सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पुष्प, भेटवस्तू देऊन सन्मानित केले. सर्वांनीच शैक्षणिक वर्षात चांगले काम केले असून, त्यातील काही प्रातिनिधिक स्वरूपात दोघांचा चांदीची नेम प्लेट देऊन सत्कार केल्याचे सांगत कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी सर्वांचे कौतुक केले.
सिंहगड पब्लिक स्कूलने 1 एप्रिल रोजी शिक्षकांचे आभार मानले. शिक्षकांची प्रेरणा आणि समर्पण लक्षात घेऊन हा आनंद साजरा करण्यासाठी, आम्ही आनंददायी उपक्रमांमध्ये सहभागी झालो. पुन्हा एकदा शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करत असताना सिंहगड पब्लिक स्कूल शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करत असल्याचे प्राचार्या शाहीन शेख यांनी सांगितले.