
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ स्वारगेट स्थाकावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्य संघटक वसंत मोरे यांनी या बस स्थाकावर उभ्या असलेल्या जुन्या बसमध्ये साड्या आणि दारूच्या बाटल्या सापडल्याचा आरोप केला आहे.
वसंत मोरे म्हणाले की, ”स्वारगेट बस स्थानाकात घडलेल्या घटनेत कर्मचाऱ्यांचा हात आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांचे काम आगाराची सुरक्षा करणे आहे. पण जर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कॅबीनसमोरच महिलेवर अत्याचार होत असतील तर, त्यांना कॅबीनमध्ये बसण्याचा अधिकार नाही.”
#WATCH | Vasant More, Shiv Sena (UBT) leader, says, ” The incident that took place here, it happened in front of security cabin. If a woman is raped in front of security cabin, nobody has the right to sit there” https://t.co/pCMFHGFftU pic.twitter.com/fattQ15IY0
— ANI (@ANI) February 26, 2025