महसूलमंत्री असताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील महसूल प्रशासनामध्ये त्यांच्या मजर्जीतील अनेक अधिकाऱ्यांना आणून की पोस्टवर बसवले. मात्र, आता नव्या सरकारमध्ये महसूलमंत्री बदलल्याने आणि विखे-पाटील यांचे वर्चस्व कमी झाल्यामुळे त्यांच्या नावाचा शिक्का असणाऱ्या जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट होणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने चलबिचल वाढली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्री असतानादेखील त्यांना न जुमानता परस्पर तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी उपायुक्तपदी. जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय, मुद्रांक महानिरीक्षक, त्याचबरोबर जमाबंदी आयुक्तालय आणि शासनाच्या इतर खात्यांमध्ये असलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या खुर्चीमध्ये विखे-पाटील यांनी त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना आणून बसवले.
महसूलमंत्रिपदाची धुरा आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नव्या सरकारमध्ये विखे-पाटील यांचे महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मर्जीने पुणे जिल्ह्यातील महसूल प्रशासनामध्ये पदांवर बसलेल्या अधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. मध्यावधी बदल्या होण्याच्या शक्यतेमुळे संक्रांत कोणावर कोसळणार, यांची नावासह चर्चा होत आहे.
विखे-पाटील यांच्या बच्चा होत आहे विखे पाटील यांच्या प्रांताधिकाऱ्यांच्या अनेकदा मध्यावधी बदल्या करण्यात आल्या. काही अधिकाऱ्यांना एका दिवसात बदलण्यात आले. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. काही अधिकाऱ्यांनी नियमबाह्य बदलीच्या विरोधात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणामध्येही दाद मागून स्थगिती आदेश मिळवले होते. पदाचा कालावधी पूर्ण झाला नसतानादेखील अनेक अधिकाऱ्यांना बदलीला सामोरे जावे लागले होते. आता हाच फॉर्म्युला शिक्का असलेल्या अधिकाऱ्यांनाही लागू होऊ शकतो, असे एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले.
बावनकुळेंचा इशारा
जिल्ह्यातील प्रशासकीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. परंतु महसूल खात्यामध्ये राधाकृष्ण विखे- पाटील यांनी स्वतःच्या मर्जीतील अनेक वादग्रस्त अधिकाऱ्यांना तहसीलदार, प्रांताधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी पुण्यात आणून बसवले होते. त्यामुळे अजित पवार हेदेखील काहीसे नाराज होते. आता नवे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मुंबईत यापुढे कोणाही अधिकाऱ्यांना पैसे देऊन पदे मिळवता येणार नाहीत, असे सांगून वादग्रस्त अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.