Pune News – जेवण देण्यास नकार दिल्याने थेट कंटनेर हॉटेलमध्ये घुसवला, कारचेही नुकसान

जेवण देण्यास नकार दिल्याने मद्यधुंद चालकाने थेट कंटेनरच हॉटेलमध्ये घुसवल्याची धक्कादायक पुण्यातील इंदापूर येथे घडली. हॉटेलबाहेरीस कारलाही कंटनेरने धडक देत मोठे नुकसान केले. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही भयंकर घटना घडली. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आरोपी चालक सोलापूरहून पुण्याकडे कंटेनर घेऊन येत होता. याचदरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावर हिंगणगाव येथे हॉटेल गोकुळजवळ जेवणासाठी त्याने कंटेनर थांबवला. चालक नशेत असल्याने हॉटेल मालकाने त्याला जेवण देण्यास नकार दिला. यामुळे कंटनेर चालक संतापला.

मद्यधुंद चालकाने कंटनेर थेट हॉटेलमध्ये घुसवला. त्यानंतर कंटेनर रिव्हर्स घेत हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या कारला चिरडले. यानंतर स्थानिकांनी कंटनेरवर दगडफेक करत रोखण्याचा प्रयत्न केला.