पार्टीवरून परतत असताना कारची बसला धडक, दोघांचा मृत्यू; चौघे जखमी

वाढदिवसाची पार्टी परतत असताना भरधाव स्विफ्ट कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघात कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर चौघे जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील नवले पुलावर शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

कारमधील सहा तरुण वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. तेथून परतत असताना भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि कार बसला मागून धडकली. अपघातात कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. दोन मित्र जागीच ठार झाले. तर चौघे जखमी झाले असून त्यांना आधी नवले रुग्णालयात नेण्यात आले. मग पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.