
पुण्यात चितळे बंधूंचे नाव वापरून बनावट बाकरवडीची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांच्या प्रसिद्ध असलेल्या ‘बाकरवडी’ची कॉपी करून ‘चितळे स्वीट होम’ नावाने बनावट बाकरवडी बाजारात विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नावाचा गैरवापर करून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.