Pune News : बैलगाडा शर्यतीत एकाला बेदम मारहाण, 11 जणांविरोधात गुन्हा दाखल

वाळुंजवाडी येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नंबर लावण्याच्या कारणावरून एका तरुणाला काही टवाळखोरांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी 11 जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी गावाच्या हद्दीत बैलगाडा शर्यत सुरू होती. यावेळी टोकन म्हणजेच बैलगाडा शर्यतीला नंबर लावण्याच्या कारणावरून कुणाल संतोष खिरड (वय 21) याला 10 ते 11 जणांनी मिळून बेदम मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी कमलेश निघोटे, प्रथमेश निघोटे, हर्षल निघोटे, प्रमोद लोंढे, भावेश निघोटे अशी आरोपींची नावे आहेत. तसेच या गुन्ह्यात इतर सहा जणांचा सुद्धा समावेश आहे. यासंदर्भात दिनेश रामदास खिरड यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार एकूण 11 जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार नंदकुमार आढारी करत आहेत.