
जीबीएस आजाराचे अद्याप महापालिकेला गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या 144 पाण्याच्या टाक्यांपैकी 52 टाक्यांची स्वच्छता केली गेली आहे. जीबीएस बाधित धायरी, नव्हे, सिंहगड रस्ता क्षेत्रातील 50 टक्के टाक्यां अद्याप अस्वच्छ आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाला या गोष्टीचे गांभीर्य कधी येणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सिंहगड रस्त्यावरील धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नन्हे, आंबेगाव परिसरात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात जीबीएसचे रुग्ण आढळले होते. अद्याप हे संकट पुर्णपणे दुर झाले नाही. जीबीएस आजार हा अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे होत असल्याची माहीती पुढे आली आहे. या पार्श्वभुमीवर पाणी पुरवठा विभागाच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला होता. संपुर्ण शहरातील पाण्यांच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात येत आहे. शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या 144 टाक्या असुन, त्यापैकी 52 टाक्यांची स्वच्छता पुर्ण झाल्या आहेत. मात्र, जीबीएस बाधित सिंहगड रस्त्यावरील धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नन्हे, आंबेगाव परिसरत 44 पाण्याच्या टाक्या असुन, यापैकी केवळ 24 टाक्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.
21 आरओ प्रकल्प सील
सिंहगड रस्त्यावरील धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नन्हे, आंबेगाव परिसरत जानेवारी, फेब्रुवारीत मोठ्या प्रमाणात जीबीएसचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिकेकडून या भागातील आरओ प्रकल्पांच्या पाण्याची तपासणी केली होती. यात 30 मधील 27 प्रकल्पांचे पाणी दूषित असल्याचे समोर आल्याने हे प्रकल्प बंद केले होते. तसेच त्यांना पाणी शुद्धीकरणाची नियमावली घालून दिली होती. एका प्रकल्प चालकाकडून विहिरीतील पाणी शुद्ध म्हणून विकल्यानंतर एका मुलाला जीबीएसची बाधा झाली होती. तो व्हेंटिलेटरवर आहे. याची गंभीर दखल घेत महापालिकेने गेल्या तीन दिवसांत पुन्हा पाहणी करून 21 प्रकल्प सील केल. तर, नियमांची पुर्तता करणाऱ्या 4 प्लँटला परवानगी दिली आहे