
> महापालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षात ‘पीएमपी’च्या संचलन तुटीकरिता 536 कोटी 41 लाख रुपयांची तरतूद केली आहे, तर आर्थिक वर्षात ‘पीएमपी’च्या ताफ्यात स्वमालकीच्या 200 नवीन सीएनजी बसेस दाखल होणार आहेत, तर 400 सीएनजी बसेस कंत्राटी तत्त्वावर दाखल होतील. सुतारवाडी-पाषाण व निगडी भक्ती-शक्ती डेपो या दोन ठिकाणी ‘बीओटी’ तत्त्वावर डेपोसह व्यापार संकुलाच्या बांधकामाचा प्रकल्प करून त्याद्वारे आर्थिक उत्पन्न मिळविण्याचे नियोजन केले आहे. ‘पीएमपी’च्या डेपोंमध्ये व मिळकतींवर ई-चार्जिंग स्टेशन व सोलर पॅनेल उभारणे, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. महापालिका हद्दीतील ‘बीआरटी’ स्थानकांना स्वयंचलित दरवाजे बसविणे व सुरक्षारक्षक नेमणे, तसेच सर्व बीआरटी कॉरिडॉर व बस स्थानकांवर एआरपीएन कॅमेरे व सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहेत.
स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र उभारणार
‘सिस्टर स्कूल’ ही योजना राबविणार.
> टाकाऊ वस्तूपासून शिल्प तयार करून ते शहरातील चौकात बसविणार.
> महापालिकेच्या जागा खासगी संस्थांच्या
माध्यमातून विकसित करून उत्पन्न वाढविणार.
> बांधकाम परवानगीसह अन्य परवानग्यांसाठी अॅप तयार करणार.
> शहरातील स्मशानभूमी अद्ययावत करणार.
> महंमदवाडी येथे क्रीडा संकुल उभारणार.
> सिटी लायब्ररी येथे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू करणार.
विभागनिहाय तरतूद
> पाणीपुरवठा विभाग- १६६५.७८ कोटी
> मलनिःसारण विभाग – १४३१.६३ कोटी
> घनकचरा विभाग १४२.३५ कोटी
> आरोग्य विभाग ५६९.८९ कोटी
> नगररचना नियोजन १०७.९८ कोटी
> वाहतूक नियोजन व प्रकल्प विभाग २७९.६५ कोटी
> पथ विभाग- १६२६.५७ कोटी
> उद्यान विभाग १६८.९९ कोटी
> पर्यावरण विभाग ८.५२ कोटी
> विद्युत विभाग – ८०.७२ कोटी
> भवनरचना विभाग ५७०.९६ कोटी
> माहिती तंत्रज्ञान विभाग ४८.५६ कोटी
> हेरिटेज सेल २३.१९ कोटी
> प्राथमिक शिक्षण ९०१.९४ कोटी
> समाजविकास विभाग ९५.६३ कोटी
प्रमुख तरतुदी
भूसंपादनासाठी भरीव तरतूद
> भूसंपादन विभागाकडून नवीन भूसंपादन नागदा-२०१३नुसार एकूण ६५ भूसंपादन प्रकरणांची कार्यवाही सुरू आहे. महापालिका हद्दीत रस्त्यांच्या कामांसाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे. भूसापदन करण्यापूर्वी प्रकल्प सुरू केला जातो. त्यासाठी निधीही दिला जातो; परंतु भूसंपादन न केल्याने प्रकल्प रखडतो. भविष्यात तसे होऊ नये म्हणून भूसंपादनासाठी पहिल्यांदाच भरीव तरतूद केली असून, शासनाकडेही निधीची मागणी केली आहे.
> आमदार, माजी नगरसेवक आणि इच्छुकांकडून बजेटमध्ये ३० हजार कोटींच्या कामांची यादी दिली होती. मात्र, योग्य असलेल्या संबंधित लोकप्रतिनिधींच्या मागण्यांचा विचार अंदाजपत्रकात केला आहे. नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून अंदाजपत्रक केल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
पुणे महापालिकेचे आर्थिक वर्ष २०२५-२६चे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले
अभिनव शाळा, सिस्टर स्कूल अन् शाळांमध्ये सीसीटीव्ही
> महापालिकेच्या शिक्षण विभागासाठी सुमारे ९०१ कोटींची तरतूद केली आहे. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांत अभिनव शाळा तयार केल्या जाणार आहेत. ‘सिस्टर स्कूल’ ही योजना राबविली जाणार आहे. या योजनेत महापालिकेच्या शाळांजवळील खासगी शाळेतील शिक्षक आठवड्यातून दोन तास महापालिकेच्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देतील. गणवेश, शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती, शैक्षणिक सहल, व्याख्यानमाला, ‘सीएसआर’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी तरतूद केली गेली आहे. माजी नगरसेवक आणि इच्छुकांकडून ३० हजार कोटींच्या मागण्या यांनी आज स्थायी समितीला सादर केले. गेल्या काही वर्षांपासून आमदार आणि खासदारांना स्थानिक पातळीवरील कामे करण्यासाठी तीन ते पाच कोटी रुपयांचा निधी महापालिकेच्या अंदाजपत्रकात ठेवला जात होता. मात्र, नगरसेवक नसल्याने मागील तीन वर्षांपासून आमदार अंदाजपत्रकातील तरतुदींव्यतिरिक्त त्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी वर्गीकरणातून निधी मिळवीत आले आहेत. सत्ताधारी पक्षातील समान पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करणार.
> समान पाणीपुरवठा योजनेचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर २०२५अखेर उर्वरित कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शहराच्या काही भागांमध्ये मीटरचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पांअंतर्गत एकूण १४१ पाणीपुरवठा झोन असून, त्यांपैकी ६२ झोनचे काम पूर्ण झालेले आहे.
पाणीगळती शोधण्याासाठी ५० लाखांची तरतूद
> पुणे शहरामध्ये पाण्याची गळती होत असून,
समान पाणीवाटप योजनेअंतर्गत देखभाल शोधण्यासाठी दुरुस्तीमध्ये गळती शोधणे व दुरुस्त करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नदीसंवर्धन योजनेअंतर्गत प्रदूषण नियंत्रण
> २०२५-२६ मध्ये प्रकल्पातील एकूण ११ मैला पाणी शुद्धीकरण केंद्रांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ५३.५ कि.मी. लांबीच्या मुख्य मलवाहिन्यांची कामे पूर्ण केले जाणार आहेत. या प्रकल्पाकरिता आर्थिक वर्षात ५४० कोटी ५० लाख रुपये इतकी तरतूद महापालिकेने केली असून, २०२५-२६ या आर्थिक वर्षात ‘पीएमपी’च्या संचलन तुटीकरिता ५३६ कोटी ४१ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एकच घोषणा
> महापालिकेचे नुकतेच अमृतमहोत्सवी वर्ष साजरे झाले आहे. यानिमित्ताने या अर्थसंकल्पात अमृतमहोत्सवी आरोग्य योजना जाहीर करण्यात आली आहे. खासगी संस्थांच्या मदतीने कर्करोग निदान करण्यासाठी पेट स्कॅन प्रकल्प या वर्षात कार्यान्वित केला आहे. आरोग्य विभागासाठी ५६९ कोटी ८९ लाखांची तरतूद केली आहे.
नगरसेवकदेखील निधीसाठी पाठपुरावा करून ते पदरात पाडून घेत आहेत. त्यामुळे अनेकांनी आपआपल्या भागातील कामांसाठी आयुक्तांना पत्र देऊन निधीची मागणी केली होती. दरम्यान, प्रभागातील कामांसाठी लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक आणि इच्छुकांनी मागण्या केल्या. मात्र, महापालिकेचे उत्पन्न कसे वाढेल, याबाबत काय उपाययोजना सुचविल्या? अशी विचारणा केली असता, आयुक्तांनी उत्तर देणे टाळले.