पुण्यात आणखी दोन मार्गावर धावणार मेट्रो, केंद्राला 9 हजार 897 कोटींचा प्रस्ताव; अर्थसंकल्पात घोषणा

पुणे मेट्रोसाठी राज्य सरकारने 9897 कोटी रूपयांचा अर्थसंकल्पीय प्रस्ताव केंद्राला सादर केला आहे. खडकवासला-स्वारगेट हडपसर खराडी आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग या दोन मार्गिकांचा यामध्ये समावेश आहे. हा प्रस्ताव वगळता अर्थसंकल्पात पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत.

राज्याचा अकरावा अर्थसंकल्प आज सादर झाला. त्यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली. अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील दुनया टप्प्यातील मेट्रोच्या कामांची माहिती दिली. पहिल्या टप्प्यामध्ये पुण्यातील मध्यवर्ती भागात मेट्रोचे जाळे पसरलेले आहे. मात्र, पुण्याच्या आजुबाजूला देखील मेट्रोचे जाळे पसरविण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन मार्गिका होणार आहेत. पुण्यात एकूण 23 किलोमीटरचा मार्ग खुला होणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका आणि या प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे, पुणे मेट्रो टप्पा दोन अंतर्गत स्वारगेट ते खडकवासला, स्वारगेट हडपसर खराडी आणि नळ स्टॉप- वारजे माणिकबाग या दोन मार्गीकांच्या 9897 कोटी रुपयांच्या प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवलेला आहे.

पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण रस्त्यांना निधी
पुणे ते शिरूर या 54 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 7515 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्याचबरोबर तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर मार्गावर उन्नत चार पदरी रस्ते बांधणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 6499 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे त्याचबरोबर पुण्यात आंबेगाव येथील शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपये देण्यात आले आहेत.