पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन होणार होते. पण मुसळधार पावसामुळे हा कार्यक्रम रद्द झाला होता. आता पंतप्रधान मोदी हे प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी एक्स ट्विट करून ही माहिती दीली आहे.
मोदी यांनी एक्स पोस्ट करून म्हटले आहे की, उद्या, 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीमार्फत महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांहुन अधिक खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहे. यात पुणे मेट्रोचा जिल्हा न्यायालय ते स्वारगेट विभाग, बिडकीन औद्योगिक क्षेत्र, सोलापूर विमानतळ आणि इतर यांचा समावेश आहे.