अखेर नवीन टर्मिनल प्रवाशांच्या सेवेसाठी खुले

पुणे : लोहगाव येथील बहुप्रतीक्षित नवीन टर्मिनल उद्घाटनानंतर अखेर चार महिन्यांनी रविवारी सुरू झाले. नवीन टर्मिनलवरून पुण्याहून दिल्लीसाठी ‘एअर इंडिया’चे पहिले उड्डाण (एआय-858) झाले. लेफ्टनंट कर्नल मनीषा डबास या नवीन टर्मिनलवरून प्रवास करणाऱया पहिल्या प्रवासी ठरल्या. पेंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते डबास यांना बोर्डिंग पास देण्यात आला. त्यानंतर ‘एअर इंडिया एक्प्रेस’चे पुण्याहून भुवनेश्वरसाठी दुसरे उड्डाण (आय 5-320) झाले. त्या विमानाच्या प्रवाशांनादेखील बोर्डिंग पास देण्यात आला. नवीन विमानतळ सुरू झाल्याने प्रवासी सुखावले होते. चार महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टर्मिनलचे उद्घाटन झाले होते. परंतु आवश्यक सुरक्षारक्षक व काही कामे राहिल्याने विमानतळ प्रत्याक्षात सुरू झाले नव्हते. अद्ययावत नवीन विमानतळ सुरू झाल्याने प्रवाशांना मात्र दिलासा मिळाला आहे.