शिवनेरी जुन्नर, वेगवान पुणे संघांना विजेतेपद, पुणे लीग कबड्डी स्पर्धा

अत्यंत चुरशीच्या पुणे लीग कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात शिवनेरी जुन्नर, तर महिला विभागात वेगवान पुणे या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करीत झळाळत्या सतेज करंडकावर आपले नाव कोरले. प्रणव बांगर हा शिवनेरी जुन्नर संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला, तर प्रज्ञा कासारने वेगवान पुणे संघाच्या जेतेपदात मोलाचा वाटा उचलला.

पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पार्थ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँगेस राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत कदम, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यकाह बाबूराव चांदेरे, उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, खजिनदार मंगल पांडे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, सरकार्यवाह दत्तात्रय झिंजुर्डे, माजी कार्याध्यक्षा कासंती बोर्डे, वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा काटकर, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेर आदी मान्यवर उपस्थित होते.

बांगरने फिरविला माय मुळशीच्या स्वप्नांवर नांगर

पुरुषांच्या अंतिम सामन्यात शिवनेरी जुन्नर संघाने माय मुळशी संघावर 47-43 किजय असा मिळविला. मध्यंतराला शिवनेरी जुन्नर संघाकडे 24-15 अशी आघाडी होती. शिवनेरी जुन्नर संघाच्या प्रणव बांगरने चौफेर चढाया करीत सर्वाधिक 20 गुणांची कमाई करीत माय मुळशी संघाच्या जेतेपदाच्या स्वप्नांवर नांगर फिरविला. याचबरोबर शुभम बिटकेने 9 गुण मिळकिले, तर प्रकीण बाबरने 4 क स्कप्नील कोळी याने 3 पकडी घेतल्या. माय मुळशीच्या राहुल वाघमारे याने 11 गुणांसह 2 बोनस गुण मिळकिले. आदित्य गोरे याने 9 गुणांसह 2 बोनस गुण मिळकिले. अजित राठोड याने 9 गुणांसह 2 बोनस गुण मिळकिले.

वेगवान पुणेपुढे शिवनेरी जुन्नरची दमछाक

महिलांच्या अंतिम सामन्यात वेगवान पुणे संघाने शिवनेरी जुन्नर संघाकर 28-19 असा दणदणीत विजय मिळवित सतेज करंडक पटकाकिला. मध्यंतराला वेगवान पुणे संघाकडे 18-9 अशी आघाडी होती. वेगवान पुणे संघाने संपूर्ण सामन्यात 4 बोनस गुण मिळविले, तर दोन गुण लोणचे क एक गुण तांत्रिक गुण मिळकिला. शिवनेरी संघाने 6 बोनस गुण मिळविले. केगकान पुणे संघाच्या प्रज्ञा कासार हिने चौफेर चढाया करीत 12 गुण मिळकिले व आपल्या संघाला भक्कम आघाडी मिळकून दिली. साक्षी गावडे हिने 3 व निकिता खाडे हिने 2 चांगल्या पकडी घेतल्या. शिकनेरी जुन्नर संघाच्या रिया धुमाळ हिने 10 गुण मिळकून जोरदार प्रतिकार केला. सिफा कस्ताद हिने 3 पकडी घेतल्या. मात्र, वेगवान पुणे संघाच्या सरस खेळापुढे दमछाक झाल्याने शिवनेरी जुन्नरला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले.