‘स्मार्ट’ पुणे वाहतूक कोंडीत जगात चौथे!

‘स्मार्ट सिटी’ पुणे शहर हे पूर्णपणे वाहतूक काsंडीत अडकले आहे. एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार पुण्यात 10 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 33 मिनिटे 22 सेकंद लागतात. त्यामुळे जगातील सर्वात मंद वाहतूक असलेल्या शहरांमध्ये पुणे चौथ्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत मुंबई 39व्या स्थानावर आहे.