बिलिंगसाठी कर्मचारी नसल्याने मृतदेह आठ तास रुग्णालयातच

रुग्णाच्या नातेवाईकांनी बिल न अदा केल्याने मृतदेह अडवून ठेवण्याच्या घटना आजवर अनेक रुग्णालयांत घडल्या आहेत; मात्र बिल भरण्यास तयार असूनही केवळ बिलिंग करण्यासाठी कर्मचारी नसल्याने आठ तास मृतदेह अडवून ठेवल्याची धक्कादायक घटना पूना हॉस्पिटलमध्ये घडली.

शुक्रवार पेठेतील महेश पाठक यांच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी बिल भरून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हॉस्पिटलकडे चौकशी केली असता तुमच्या रुग्णावर महापालिकेच्या शहरी गरीब योजनेअंतर्गत उपचार सुरू होते. त्यामुळे तुम्हाला सकाळी साडेआठ वाजता बिल भरून मृतदेह नेता येईल, असे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले.