भरधाव वेगाने कार चालवून दुचाकीला धडक देत तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:वर घेण्यासाठी चालकाला डांबून ठेवत, त्याचा मोबाइल काढून घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले सुरेंद्रकुमार अगरवाल आणि विशाल अगरवाल यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांनी हा आदेश दिला. चालकाला डांबून ठेवून त्याचा मोबाईल काढून घेतल्याप्रकरणी सुरेंद्रकुमार अगरवाल (77), विशाल अगरवाल (50) यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणातील मोबाईल जप्त करण्यात आला आहे.