ससूनमधील तीन परिचारिकांची चौकशी

ससून रुग्णालयातील तीन परिचारिकांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. ज्यावेळी रक्तनमुन्यात फेरफार करण्यात आले, त्यावेळी डॉक्टरांसोबत दोन ते तीन परिचारिका उपस्थित असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. या परिचारिकांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपास करण्यात येत आहे. रक्तचाचणी नमुने बदल कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आले, याची संपूर्ण चौकशी गुन्हे शाखेकडून केली जात आहे. विशेषत: ससूनमधील शिपायापासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांची चौकशी केली जात आहे.