
रस्त्यालगत मोटार उभी करून लघुशंका करणाऱ्याला जाब विचारणाऱ्या धनाढ्या बापाच्या लेकांना पोलिसांनी इंगा दाखविला आहे. विकृत चाळे केल्याप्रकरणी दोघांना अटक केल्यानंतर सोमवारी येरवडा पोलिसांनी त्यांना घटनास्थळी नेले. त्याठिकाणी स्पॉट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पुर्ण केली. तोंडावर काळा बुरखा आणि हातात दोरखंडा असलेल्या दोघांची पोलिसांनी धिंड काढली. गौरव मनोज आहुजा (वय 25, रा. कोंढवा) भाग्येश प्रकाश ओसवाल (वय 22, रा. मार्केटयार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आरोपी भाग्येशला न्यायालयीन कोठडी सुनाविली असून, गौरवला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शास्त्रीनगर चौकात मोटार थांबवून गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश मद्यप्राशन करत होते. त्यानंतर गौरवने मोटारीतून खाली उतरून लघुशंका केली. याप्रकरणी परिसरातून जाणाऱ्या नागरिकाने त्याला जाब विचारला असता, त्याने वादविवाद केला. याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान, कृत्याचा पश्चाताप झाल्यानंतर गौरवने व्हिडिओद्वारे पुणेकरांसह जनतेची माफी मागितली.