कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्याचा डाव पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. याप्रकरणी टोळीतील दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन पिस्तुलांसह 7 काडतुसे जप्त केली आहेत. मोहोळच्या पहिल्या वर्षश्राद्धाला विरोधी टोळीचे मुळशीत काम सांभाळणाऱ्याचा गेम करण्यात येणार होता. मात्र, त्याआधीच युनिट दोनने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
संदेश लहू कडू (वय – 22, रा. कोथरूड) आणि शरद मालपोटे (वय – 29, रा. सुतारदरा, कोथरूड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कुख्यात शरद मोहोळ याचा 5 जानेवारी 2024 रोजी टोळक्याने भरदिवसा दुपारी दीड वाजता कोथरूड परिसरात गोळ्या घालून खून केला होता. दुचाकीस्वार तीन ते चार हल्लेखोरांनी मोहोळला सुतारदरा परिसरात गाठून बेछूट गोळीबार केला. पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली.
दरम्यान, शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या साथीदारांनी तयारी केली होती. त्यासाठी आरोपींनी मध्य प्रदेशातील इंदोरमधून दोन पिस्तुलांची खरेदी केली. मोहोळच्या पहिल्या वर्ष श्राद्धला विरोधी गटातील एक दोन जणांवर मुळशीत गोळीबार करून त्यांचा खून केला जाणार होता. ज्या पद्धतीने मोहोळची हत्या झाली, तशाच पद्धतीने गोळीबार करून विरोधी टोळीतील गुन्हेगारांवर चाल करण्याचा डाव रचल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मोहोळ याच्या खुनानंतर गुन्हे शाखेकडून वेळोवेळी परिसरात बारकाईने लक्ष केंद्रित केले होते. कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी खबरदारी घेतली होती. दरम्यान, मोहोळच्या पहिल्या वर्ष श्राद्धला गोळीबाराचा मोठा धमाका करून गेम होणार असल्याची माहिती युनिट दोनला मिळाली. पथकाने सुतारदरा परिसरातून दोघांना ताब्यात घेत दोन पिस्तुले मिळून आली. चौकशीत आरोपींनी मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तयारी केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, एपीआय अमोल रसाळ, आशिष कवठेकर, उपनिरीक्षक नितीन कांबळे, अमोल सरडे, ओमकार कुंभार, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, विजय पवार संजय आबनावे, पुष्पेंद्र चव्हाण, राहूल शिंदे, हनुमंत कांबळे, संजय जाधव यांनी केली.
रेकी करून मोहोळचा केला होता खून
गँगस्टर शरद मोहोळ याच्याविरूद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, सरकारी कामात अडथळा असे गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आल्यानंतर सुतारदरा परिसरात कुटूंबियांसह राहायला होता. ५ जानेवारीला दुपारी सव्वा एकच्या सुमारास मोहोळ घराखाली उभा असताना, दुचाकीवर आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी त्याच्यावर पिस्तुलातून