![crime](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/09/crime--696x447.jpg)
पत्नीला शिवी दिल्याच्या रागातून पतीने चुलत भावाला पाचव्या मजल्यावरून खाली ढकलून दिल्याची घटना पुण्यात घडली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. पुण्यातील नांदेड सिटीजवळ ही घटना घडली. अमर किसन देशमुख असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मयत तरुण आणि आरोपी मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी आहे. कामानिमित्त ते पुण्यात नांदेड सिटीत आले होते. दोघेही सोनपापडी बनवण्याच्या कारखान्यात कामाला होते.
कौटुंबिक वादातून मयत अमरच्या पत्नीला आरोपी राजू देशमुख शिवीगाळ करत होता. यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. यावेळी अमर राजूला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला. यावेळी राजूने त्याला पाचव्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली फेकले. यात गंभीर जखमी झालेल्या अमरचा मृत्यू झाला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.