
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटणकडे चालली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सध्या जामिनावर बाहेर आला होता. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 12 पथके रवाना झाली आहेत. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.