घटस्फोटाची सुनावणी पुण्यातच; कोर्टाचा पत्नीला दिलासा देण्यास नकार

घटस्फोटाची सुनावणी पुण्यात न घेता मुंबईत घ्यावी, ही पत्नीची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली नाही. शक्य असेल तेव्हा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजर राहण्याची मुभा पत्नीला द्यावी, असे आदेश न्यायालयाने पुणे कोर्टाला दिले आहेत. न्या. अरुण पेडणेकर यांच्या एकल पीठासमोर ही सुनावणी झाली. पती-पत्नी गेली 20 वर्षे पुण्यात राहत होते. आता पत्नी मुंबईत वास्तव्यास आली आहे. पती पत्नीला 50 हजार रुपये देखभाल खर्च देतो. पत्नीनेच पुणे कुटुंब न्यायालयात घटस्ठी अर्ज दाखल केला आहे. तेव्हा ती पुणे कोर्टातील सुनावणीसाठी हजर राहू शकते, असे नमूद करत न्या. पेडणेकर यांनी पत्नीची मागणी फेटाळून लावली.