
स्थानिक रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण करत दोघांनी सोसायटीतील अंतर्गत रस्त्यावर थार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची रेस लावण्याचा प्रकार वाघोलीत घडला. याचा जाब विचारणाऱ्या सोसायटीतील रहिवाशांना चालकांनी दमदाटी केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर वाघोली वाहतूक विभागाने दोन्ही वाहनांवर कारवाई केली असून, त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येणार आहे. हा प्रकार वाघोली येथील एका सोसायटीत बुधवारी (9 जुलै) दुपारी घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या गाड्या ताब्यात घेतल्याचे वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी सांगितले.
वाघोली येथील सोसायटीत दोघांनी बेकायदेशीर प्रवेश केला. त्यानंतर सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर थार आणि – स्कॉर्पिओ गाडीची रेस केली. हा प्रकार इमारतीच्या छतावरून एका व्यक्तीने मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. त्यामध्ये दोन गाड्या एका ठिकाणी थांबून वेगात धावत आहेत. गाड्या पळवून झाल्यानंतर सोसायटीतील काही व्यक्तींनी थार गाडी चालविणाऱ्या तरुणाला थांबवून जाब विचारला. त्यावेळी त्याने उद्धटपणे वर्तन करत अरेरावीची भाषा केली. सोसायटीतील व्यक्तीने म्हटले या ठिकाणी आमची मुले खेळतात, त्यावेळी गाडीतील तरुण म्हणतो कुठं खेळत्यात मुलं, ही काय खेळायची जागा आहे का, याबाबतचादेखील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
स्थानिक रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण करत दोघांनी सोसायटीतील अंतर्गत रस्त्यावर थार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची रेस लावण्याचा प्रकार वाघोलीत घडला. याचा जाब विचारणाऱ्या सोसायटीतील रहिवाशांना चालकांनी दमदाटी केली. pic.twitter.com/AyGRP3LE7s
— Saamana Online (@SaamanaOnline) April 11, 2025