साई मंदिर सुरक्षेसाठी 7 सदस्यीय समिती गठीत करा, उच्च न्यायालयाचे आदेश

शिर्डी येथील साईबाबा मंदिराच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ किंका सीआयएसएफ तैनात करण्यासंदर्भात शिफारस करण्यासाठी 7 सदस्यीय समिती गठीत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाचे न्यायमूर्ती आर.क्ही. घुगे क न्यायमूर्ती आर.एम. जोशी यांनी आज शासनाला दिले आहेत. सदर समितीने गोपनीय अहकाल 30 नोव्हेंबर 2024पर्यंत खंडपीठात सादर करण्याचेही आदेश खंडपीठाने दिलेले आहेत.

कोपरगाक येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शिर्डी येथील साईबाबाचे मंदिर क परिसराची सुरक्षा सीआरपीएफ किंवा सीआयएफएस यांच्याकडे देण्यात याकी, अशी विनंती करणारी एक जनहित याचिका ऍड. सतीश तळेकर यांच्यामार्फत खंडपीठात दाखल केलेली आहे.