चिमुरड्यासोबत गिरक्या घेताना जाग्यावर कोसळला, गरबा किंग अशोक माळी यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

देशात नवरात्रोत्सवानिमित्त गरब्याची धुमधाम सुरु असताना एक दु:खद घटना घडली आहे. पुण्यात चाकण येथे प्रसिद्ध गरबा किंग म्हणून प्रसिद्ध असलेले कलाकार अशोक माळी यांचा गरबा खेळताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. मुलासोबत गरबा खेळत असताना भोवळ आली आणि ते खाली कोसळले. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले असता त्यांचा तोपर्यंत मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अशोक माळी घुंगट मे चाँद होगा आखो मे सजनी. या गाण्यावर त्यांनी मुलासोबत फेर धरला होता. मात्र अचानक ते जमिनीवर कोसळले आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अशोक माळी हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील होळ गावचे रहिवासी आहेत. अशोक माळी यांचा गरबा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असे. ते गरबा प्रशिक्षक होते. नवरात्रात त्यांना वेगवेगळ्या मंडळांकडून आमंत्रण असायचे. सोमवारी ते चाकण येथे गरबा खेळण्यासाठी गेले होते. तिथे गरबा खेळत असताना त्यांचा मृत्यू झाला.