पुण्यातील कल्याणीनगरमध्ये 19 मेच्या पहाटे दोन जणांना गाडी खाली चिरडणाऱ्या 17 वर्षीय मुलाविरुद्ध सर्व पुराव्यांचा तपशील देणारा अंतिम अहवाल पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाला (जेजेबी) सादर केला आहे.
याआधी, पोलिसांनी खटल्याच्या सुनावणीसाठी अल्पवयीन मुलास प्रौढ म्हणून वागण्याची परवानगी देण्याची याचिका दाखल केली होती. त्यांच्या केसचे समर्थन करण्यासाठी, पोलिसांनी आता जेजेबीकडे संबंधित पुरावे सादर केले आहेत.
एका अधिकाऱ्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, ’19 मे रोजी संध्याकाळी त्याच्या घरापासून अपघात होईपर्यंत तोच पोर्शे कार चालवत होता, हे सिद्ध करणारे सर्व पुरावे आम्ही जेजेबीकडे सादर केले आहेत.’
‘या अहवालात त्याला कार चालवताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींची पुष्टी करणारी विधाने, तपासादरम्यान जप्त केलेले सीसीटीव्ही फुटेज आणि कोसी रेस्टॉरंट आणि ब्लॅक क्लबमध्ये त्याने दारू प्यायल्याचे पुरावे यांचा समावेश आहे. याचाच अर्थ असा की, आम्ही एक सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर केला आहे जो दाखवून देतो की तरुण, मद्यधुंद अवस्थेत, कार चालवत होता आणि दूचाकीवर स्वार असणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला’, अशी माहिती त्याने माहिती दिली.
क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, या अहवालात अल्पवयीन मुलास प्रौढ म्हणून वागणूक देण्याच्या त्यांच्या याचिकेचं समर्थन करण्यात आलं आहे.
दरम्यान, तपासात असं समोर आलं आहे की, अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने, जे त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने बदलले होते, ते ससून जनरल हॉस्पिटलमध्ये बायो-मेडिकल वेस्ट म्हणून टाकण्यात आले होते.
अल्पवयीन मुलाचे आई आणि वडील, डॉक्टर अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हळनोर – दोन डॉक्टरांसह – आणि एक रुग्णालय कर्मचारी, अतुल घाटकांबळे, सध्या रक्ताच्या नमुन्याच्या अदलाबदल प्रकरणात त्यांच्या कथित सहभागासाठी तुरुंगात आहेत.
डॉक्टर आणि अल्पवयीन मुलाच्या वडिलांमध्ये मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या दोन व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे.