बोपदेव घाटात एका 21 वर्षीय तरुणीवर तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर हे आरोपी फरार झाले होते. आता पुणे पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पीडित तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या मित्राने एका आरोपीची सीसीटीव्ही फुटेजमधून ओळख पटवली होती. त्यानंतर एका आरोपीला अटक केली आहे.
बोपदेव घाटात एक 21 वर्षीय तरुणी आपल्या मित्रासोबत रात्री फिरायला गेली होती. तेव्हा या तीन नराधमांनी तरुणीच्या मित्राला मारहाण करून बांधून ठेवले. तसेच तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या शहरात अशी घटना घडल्याने एकच गदारोळ झाला होता. पोलिसांनी या आरोपींचा कसून शोध घ्यायला सुरूवात केली होती. त्यांची रेखाचित्रेही जारी केली होती. अखेर पोलिसांना एक आरोपीचा छडा लागला. पोलिसांनी एका आरोपीला पुण्यातून ताब्यात घेतले. आधी पिडीत तरुणी आणि तरुणीच्या मित्राने आरोपीला सीसीटीव्ही फुटेजवरून ओळख पटवली. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते. इतर दोन आरोपी नागपूरला फरार झाल्याचे या आरोपीने सांगितले. तेव्हा नागपूरमधून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पहिल्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. इतर दोन आरोपींना घेऊन पुणे पोलीस नागपूरहून निघाले आहेत. त्यामुळे संध्याकाळपर्यंत या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागणार आहे.