महामार्गावर कामशेत खिंडीतील उतार व ट्रेलरचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने धडक देऊन ट्रेलर मार्गावर उलटला. उलटलेल्या ट्रेलरच्या चालकासह आगीत संपूर्ण ट्रेलर जळून खाक झाला. या दुर्घटनेत ट्रेलरमधील एकाचा होरपळून मृत्यू झाला, तर चालकासह दुचाकीवरील दोघे जखमी झाले. हा अपघात आज सकाळी साडेसहा वाजता घडला. अपघातामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
अभिषेक राम कांबळे (वय 18, रा. मोगरा, माजलगाव, जि. बीड) असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ट्रेलरचालक विलास बालाजी रायराव (वय 27, रा. करम, सोनपेठ, जि. परभणी), दुचाकीवरील आकाश श्रीधर कटके (वय 25, रा. नाणे, ता. मावळ), प्रवीण बांगर (वय 28, रा. कान्हे, ता. मावळ) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रेलरच्या चालकाचे वळणावर कामशेत खिंडीतील उतार व वळणावर गाडीवरील दुचाकीला नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रेलर एका दुचाकीला धडकून मार्गावर ‘मल्हार’ हॉटेलसमोर पलटी झला. काही वेळातच दुचाकीवरील ट्रेलरच्या केबिनने पेट घेतला. जखमी दुर्घटनेत ट्रेलरमधील अभिषेक याचा आगीत होरपळून मृत्यू झाला, तर ट्रेलरचालकासह दुचाकीवरील दोघे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच कामशेत पोलीस, ‘देवदूत’ आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ट्रेलरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला लोकांच्या मदतीने बाहेर काढले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे केबिनमध्ये अडकलेला चालकाचा मेहुणा अभिषेक कांबळे याला बाहेर काढण्यास अपयश आले. अखेर त्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आग विझविण्यासाठी पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. आग आटोक्यात आणल्यानंतर अभिषेकचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अपघातातील तिघांना कामशेत येथील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.