![crime news](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/11/crime-news-696x447.jpg)
फेसबुकवर विदेशी महिलेसोबत मैत्री झाल्यानंतर या मैत्रिणीने महागडे गिफ्ट, विदेशी चलन पाठविले. हे गिफ्ट कस्टममधून सोडविण्यासाठी कस्टम ड्युटी भरण्याच्या नावाखाली एका शासकीय कर्मचाऱ्याला सायबर चोरांनी तब्बल 16 लाख 69 हजार 727रुपयांचा चुना लावला. फेसबुक मैत्रिणीसह कस्टम अधिकारी म्हणून कॉल करणाऱ्या दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांक असलेल्या व्यक्तींच्या विरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलिंद आश्रू म्हस्के (54, रा. शिवाजीनगर, गारखेडा परिसर) हे शासकीय कर्मचारी आहेत. त्यांना 17 सप्टेंबर 2019 ला कॉलरा अमोन या महिलेच्या नावाने फेसबुकवर फ्रेंड अॅक्सेप्ट आली. मिलिंद म्हस्के यांनी ही रिक्वेस्ट एक्स्पेट केली. कॉलवर हिच्याशी मिलिंद यांचे फेसबुक मॅसेंजरवर बोलणे सुरू झाले. ही मैत्री घट्ट झाली. कॉलरा हिने मिलिंद म्हस्के यांच्याशी व्हॉट्सअप नंबर 44 7467910148, 44 7568147083 यावरूनही बोलणे सुरू झाले. कॉलरा अमोन हिने ऑनलाईन गिफ्ट पाठविण्यासाठी मिलिंद म्हस्के यांचा पत्ता व माहिती मागितली. म्हस्के यांनी त्यांचा पत्ता दिला. या महिलेने ऑनलाईन काही गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. त्यात विदेशी चलन आणि मौल्यवान वस्तू असल्याचे सांगितले.
दरम्यान, मिलिंद म्हस्के यांच्या मोबाईलवर कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगून तुमचे पार्सल कस्टममध्ये अडकले आहे. कस्टम ड्युटी भरून पार्सल सोडवा, अन्यथा पार्सल परत जाईल, असे सांगण्यात आले. यासाठी पार्सल चार्जेसच्या नावाखाली 19 खात्यांवर तब्बल 16 लाख 69 हजार 727 रुपये घेऊन मिलिंद म्हस्के यांची फसवणूक केली. या प्रकरणी मिलिंद म्हस्के यांच्या तक्रारीवरून कॉलरा अमोन तिचा व्हॉट्सअप नंबर 44 7467910148, 44 7568147083, तसेच कस्टम अधिकारी यांचा नंबर 8257898753, व 8730074130 यांच्या विरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.