पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा; खोटा पत्ता, बनावट रेशनकार्ड देत मिळवलं अपंगत्व प्रमाणपत्र

राज्यभरात चर्चेत असलेल्या वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पूजा खेडकर यांना नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग व बहुविकलांग अशी प्रमाणपत्रे देण्यात आली होती. याआधारे त्यांनी सरकारी नोकरी बळकावली होती. आता याच संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी खोटा पत्ता आणि बनवाट रेशनकार्ड देऊन अंपगत्व प्रमाणपत्र मिळवले होते, असे वृत्त ‘इंडिया टूडे‘ने दिले आहे.

पूजा खेडकर यांनी यशवंतराव चव्हाण मेमोरियनल हॉस्टिटलमध्ये प्लॉट नंबर 53, देहू आळंदी, तळवडे हा पद्दा सादर केला असून पिंपरी चिंचवडमध्ये आपले निवासस्थान असल्याचा दावा केला. मात्र त्यांनी सादर केलेल्या पत्त्यावर निवासी मालमत्ता नसून थर्मोवेरिटा इंजिनिकरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. ही कंपनी आता बंद पडलेली आहे. या कंपनीच्या पत्त्याचा वापर करून पूजा खेडकर यांनी बनवाट रेशनकार्ड मिळवले आणि याचाच वापर करून अंपगत्व प्रमाणपत्रही मिळवले.

पूजा खेडकर यांना दणका; प्रशिक्षण थांबवले

पूजा खेडकर यांचे गाव भालगाव (ता. पाथर्डी) हे आहे. खेडकर यांना नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग व बहुविकलांग अशी दोन प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र 25 एप्रिल 2018 ला तर मानसिक (बहुविकलांग) व नेत्र दिव्यांग खेडकर यांना ज्या कालावधीत दिव्यांग प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

विशेष म्हणजे बनावट अंपगत्व प्रमाणपत्रच नाही तर Thermoverita कंपनीच्या नावावर ऑडी कारचीही नोंद करण्यात आलेली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संचलन विभागानुसार या कंपनीवर गेल्या 3 वर्षांपासून 2.7 लाख रुपयेही थकीत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)