Pune: पोलीस पूजा खेडकरांच्या घरी पोहोचले, फरार कुटुंबीयांचा शोध सुरू

पिस्तुलचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पुणे पोलीस सोमवारी त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी सांगितलं की, त्यांचं कुटुंब फरार आहे आणि त्यांचा शोध घेण्यासाठी तीन तपास पथकं तयार करण्यात आली आहेत.

पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांचा पुण्यातील शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात समोर आला होता. हिंदुस्थानी कायद्याच्या विविध कलमांखाली एका शेतकऱ्यानं केलेल्या तक्रारीच्या आधारे त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी पदाचा गैरवापर आणि OBC कोट्याचा गैरवापर केल्याच्या आरोपांदरम्यान हा एक वर्ष जुना व्हिडीओ समोर आला आहे.

पोलीस मनोरमा आणि दिलीप खेडकर यांचा शोध घेत आहेत, मात्र ते बाणेर येथील त्यांच्या घरी नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यांचे फोनही बंद आहेत.

‘आरोपी फरार आहेत. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र त्यांचे फोन बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नाही. आम्ही त्यांच्या निवासस्थानी जाण्याचाही प्रयत्न केला होता, पण ते तिथे नाहीत आणि घराला कुलूप आहे. आम्ही आज पुन्हा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू’, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं इंडिया टुडेच्या वृत्ता म्हटलं आहे.

कुटुंब तपासात सहकार्य करत नसल्याचं अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं आणि कुटुंबाचा शोध घेण्यासाठी एक तपास पथकं तयार करण्यात आल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह अनेक पथकं त्यांचा पुणे आणि जवळपासच्या ठिकाणी शोध घेत आहेत. फार्महाऊस आणि त्यांच्या नावावरील इतर घरांमध्येही त्यांचा शोध सुरू आहे. आम्ही त्यांची चौकशी करू आणि त्यांच्या प्रतिसादाच्या आधारे योग्य ती कारवाई करू’, असं पोलीस सूत्रांनी सांगितल्याचं यावृत्ता म्हटलं आहे.