
दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या (पॉलिटेक्निकच्या) प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. दहावीत 100 ते 81 टक्के गुण मिळालेले तब्बल 48 हजार 242 विद्यार्थी प्रवेशाच्या रांगेत आहेत. यातील 14 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.
पॉलिटेक्निक प्रवेशासाठी 1,55,302 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी 1,27,972 विद्यार्थ्यांचे अर्ज सुविधा पेंद्रांद्वारे निश्चित केले आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. विद्यार्थी त्यांच्याशी संबंधित गुणवत्ता यादीची माहिती त्यांच्या लॉगीनमध्ये पाहू शकतात. गुणवत्ता यादीमध्ये एकूण 84,463 मुले व 43,509 मुली आहेत.
प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक पात्रता, आरक्षण इत्यादींबाबत दुरुस्ती करावयाची असल्यास 21 ते 23 जुलै या कालावधीमध्ये सुविधा पेंद्राद्वारे कागदपत्रे पडताळणीनंतर सदर बदल करू शकतात. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी संचालनालयाकडून 25 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पहिल्या पेंद्रिभूत प्रवेश फेरीसाठी पसंतीक्रम (विकल्प अर्ज) 26 ते 29 जुलै या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार झालेले पहिल्या फेरीचे जागावाटप संचालनालयाकडून 31 जुलै रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या संपूर्ण तपशिलासाठी, उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना तसेच विकल्प अर्ज भरण्यासाठी https://dte.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्या.