नेपाळमध्ये राजेशाहीवरून हिंसाचार; दोघांचा मृत्यू

नेपाळमध्ये राजेशाही परत आणण्याच्या मागणीसाठी नागरिकांची निदर्शने सुरू असतानाच अचानक आंदोलनाला हिंसक वळण लागले. हिंसाचारात सबीन महाराजन आणि सुरेश राजक या छायाचित्र पत्रकाराचा मृत्यू झाला, तर 30 जण जखमी झाले. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला.