Ratnagiri News – रेल कामगार सेनेचे रत्नागिरीत आंदोलन, मिलिंद तुळसकरांच्या फोटोला काळे फासले

शिवसैनिक आणि रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांबद्दल असंविधानिक शब्द वापरणाऱ्या कोकण रेल्वे एम्पॉईज संघाचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांचा जोरदार निषेध करत रेल कामगार सेनेने रत्नागिरी रेल्वे स्थानकात जोरदार आंदोलन केले. यावेळी मिलिंद तुळसकर यांच्या फोटोला रेल कामगार सेनेने काळे फासण्यात आले.

कोकण रेल्वे एम्पॉईज संघाचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनी एका मेळाव्यात शिवसैनिक आणि रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्याविषयी असंविधानिक शब्द वापरल्याचा आरोप रेल कामगार सेनेने केला आहे. भगवे झेंडे घेऊन रेल कामगार सेनेने रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले.

शिवसैनिक आणि रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांबद्दल असंविधानिक शब्द वापरणाऱ्या मिलिंद तुळसकर यांच्या विरोधात रेल कामगार सेनेने जोरदार घोषणा दिल्या. मिलिंद तुळसकर यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहिर निषेध करत बॅनरवरील मिलिंद तुळसकर यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, मिलिंद तुळसकर यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहिर निषेध करून आज आम्ही त्यांच्या फोटोला काळे फासले आहे.

मिलिंद तुळसकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहिर माफी मागावी अन्यथा रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उग्र आंदोलन करू असा इशारा देव यांनी दिला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत, रेल कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी राजू सुरती, कार्याध्यक्ष विलास खेडेकर, खजिनदार विश्वास राणे, गजानन गायकर, दत्ता तेलंगे, तेजस थिटे, शशी नायर, राजेंद्र ठाकूर, चंदन गुरव, दिनेश महाडेश्वर, निनाद झारी उपस्थित होते.