5 वर्षांत देशभरातील मालमत्तांच्या किमतीत 60 टक्क्यांची वाढ

मागील पाच वर्षांत घरांच्या किमतीत सतत वाढ दिसत आहे. तरीही मालमत्ता खरेदीत कमी दिसत नाही. देशात मागील पाच वर्षांत मालमत्तेच्या किमतींमध्ये 60 टक्के वाढ झाली आहे. असे असले तरी चार लाख कोटी रुपयांचा व्यवहार झालेला दिसून आला.

स्क्वेअर यार्ड अहवालानुसार, 2024 मध्ये देशात 5.77 लाख मालमत्तांचे रजिस्ट्रेशन झाले. हा आकडा 2023 पेक्षा 4 टक्क्यांनी जास्त आहे. या व्यवहाराचे एकूण मूल्य चार लाख कोटींहून अधिक आहे. मुंबईत 1.3 लाखांपेक्षा जास्त युनिटी विकले गेले. त्यातून 1.6 लाख कोटींचे मालमत्ता खरेदीचे व्यवहार झाले. बंगळुरू आणि पुणे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे. तिथे अनुक्रमे 80 हजार आणि 1 लाख युनिट्स विकले गेले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये जास्त मालमत्तांचे व्यवहार झाले. दक्षिणेकडे बंगळुरू आणि हैदराबाद येथेही मालमत्ता खरेदी जास्त आहे. गुरुग्राममध्ये 2019 नंतर मालमत्तेच्या किमतीत 5820 रुपये प्रति चौरस फुटापासून 13500 प्रति चौरस फूट एवढी वाढ दिसून आली. नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये मालमत्तांच्या किमतीत 67 टक्क्यांपर्यंत वाढ आहे.