वायनाड पोटनिवडणुकीत सुमारे 4 लाख मतांची आघाडी घेऊन प्रियंका गांधी वाड्रा विजयी झाल्या आहेत. त्यांना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यापेक्षाही जास्त मते मिळाली आहेत. राहुल गांधी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 3,64,422 मतांनी विजय मिळवला होता.
राहुल गांधींनी एकूण 6,47,445 मते मिळाली होती. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा या निवडणुकीच्या पदार्पणात त्यांचे भाऊ राहुल गांधी यांच्यापेक्षा खूप पुढे गेल्या आहेत. केरळमधील वायनाड पोटनिवडणूक त्यांनी 4 लाखांहून अधिक मतांनी त्यांनी विजय मिळवला. प्रियांका गांधी यांना 622338 मते मिळाली आहेत.
विजयानंतर प्रियांका गांधी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं आहे की, ”तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. मी खात्री करेन की, कालांतराने तुम्हाला हा विजय खरोखरच तुमचा विजय वाटेल. तसेच तुम्ही ज्या व्यक्तीला तुमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले आहे. संसदेत मी तुमचा आवाज होण्यासाठी उत्सुक आहे.”
दरम्यान, राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडल्यानंतर येथे पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यानंतर काँग्रेसने येथून प्रियांका गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. ज्यात आता प्रियांका गांधी विजयी झाल्या आहेत.