ही माझी नवीन सुरुवात, प्रियंका गांधींनी वायनाडमधून भरला उमेदवारी अर्ज

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते.


उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी प्रियंका गांधी यांनी जनतेला संबोधित केले. प्रियंका गांधी म्हणाल्या की, 35 वर्षांत पहिल्यांदा तुमच्याकडे पाठिंबा मागायला आले आहे. मला संधी द्या मी तुमच्या कुटुंबातील सदस्य व्हायला आले आहे. माझ्या भावाने 8 हजार किलोमीट पायी यात्रा केली आहे. हे आमचे संस्कार आहेत. मला सांगा तुमच्या समस्या काय आहेत. तुमच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी तुमच्या घरांपर्यंत येईन असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेलीतून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी विजय झाल्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाडमधून राजीनामा दिला होता. आता प्रियंका गांधी यांनी पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला आहे.